डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण   

मनीषा मुसळे - माने हिच्या कार्यालयातून पोलिसांकडून कागदपत्रे जप्त! 
 
सोलापूर ( प्रतिनिधी ) : एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसाईन्सेसचे संस्थापक तथा प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगेकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या हॉस्पिटलमधील कार्यालयाची पोलिसांनी झेडपी घेतली असून काही वस्तू आणि कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हॉस्पिटल मधील काही कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचेही पोलिसांनी जबाब नोंदविले आहेत. मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने असे अटक करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी डॉक्टर अश्विन शिरीष वळसंगकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनीषा मुसळे- माने हिचे अधिकार कापले आहेत.पगार कमी केला आहे. मी दोन्ही मुलांना मारणार आणि येथे हॉस्पिटलमध्ये येऊन पेटवून घेणार आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल असा धमकी दिलेल्या ई-मेल डॉक्टरांना पाठवला होता. 
 
त्यांच्या या खोट्या आरोपामुळे व धमकी वजा पत्रामुळे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी तिच्या त्रासाला कंटाळून पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी मनीषा हिला अटक केली. तिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. पोलिसांनी आरोपी मुसळे यांची कसून चौकशी केली आहे. तसेच तिच्या हॉस्पिटल मधील कार्यालयाची झडती सुद्धा घेतली आहे. त्यावेळी तिच्या हस्ताक्षर असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांच्या पथकाने डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याही हॉस्पिटल मधील कार्यालयाची तपासणी केली आहे. त्यात कोणत्या वस्तू व साहित्य जप्त करण्यात आले हे समजू शकले नाही. त्याचप्रमाणे वळसंगकर हॉस्पिटलमधील दहा ते बारा कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून पोलिसांनी त्यांची चौकशी केली आहे.पोलिसांनी या प्रकरणात डॉक्टर शिरीष वळसंगकर यांचे पुत्र डॉक्टर अश्विन वळसंगकर व सून सोनाली वळसंगकर  यांची आधीच चौकशी केली आहे.

Related Articles